Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रेमधारा

प्रेमधारा- anukokani


प्रेम शब्द ऐकायला खूप छान असतो आणि अनुभवायलाही. प्रेमात माणसं वेडी होतांना पाहिली. प्रेमात जीव देतांना पाहिले आणि जीव घेतांना ही.. पण हे कुठंवर नीट आहे बरं.. मान्य आहे ना. आजच्या आलेल्या व्यक्तीवर आपलं इथवर प्रेम होऊन जातं की आपण कुठल्याही थराला पोहोचतो आणि आपल्यावर आजन्म प्रेम करतात. त्या आईवडीलांना मात्र विसरतो. ते ही तर आपलं प्रेमच असतं ना.. फरक मात्र इतका की आपण जे प्रेम आज आलेल्या व्यक्तीवर करतो ते स्वार्थी असतो आणि आपले आई-वडील करतात ते प्रेम निःस्वार्थी असते. कुठलीही अपेक्षा, इच्छा न करता केलेल प्रेम.. 


प्रेम हा शब्द लहान असला तरी त्यात खूप काही लपलेल आहे. खूप साऱ्या भावना, विश्वास, नाते, गोडवा इ. प्रेमाला अंत नाही म्हणतात ते खरंच आहे. पण, हल्ली तरुण पिढींनी याचा बाजार बनवला आहे. विश्वास तर नाहीच पण भावना गोडवा ही कुठेच नाही फक्त आणि फक्त हवस, इच्छा आणि अपेक्षा बस...


लेखक : अनुराधा कोकणी

Post a Comment

1 Comments

  1. आजचे पिढीचा प्रेमा बद्दल तुम्ही छान लिहिलेले आहेत आणि हे खरं आहेत,आजचा पिढीचा प्रेम असेच बघायला मिळतो आहेत. आईवडिलांच्या मुलांवर असणारे प्रेम, भावना आणि मुलांचा भविष्यासाठी त्यांची धावपळ कोण्ही विचार करत नाही. आजची युवा ह्या स्वार्थी प्रेमासाठी जन्मदात्याला विसरतात, उतारवयात वयात त्यांना मदतीची गरज असते हे कोणचा का लक्षातयेत नाहीं, याचे कोण्ही विचार करत नाही.

    ReplyDelete

》अगर आप के कुछ भी सवाल हैं, वह आप नीचे दिए हुए Comment सेक्शन में पूछ सकते हैं। 《